पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना आकार घेत ८ असून जगामध्ये भास्तीय वस्तूंची मागणी वाढली आहे. नरेंद्र मोदी यांच्या अधक प्रयत्नानंतर भारतामध्ये विविध वस्तूच्या उत्पादनावा वेग दाढला. त्याचा फायदा निर्यातीमध्ये वाढ होताना स्पष्ट दिसून येत आहे. आत्मनिर्भर भारत’ ही एक व्यापक मोहीम असून त्या अंतर्गत देशामधील उत्पादनाला चालना देणे, परदेशी उत्पादकांना आकर्षित करणे, घेट गुंतवणुकीस चालना देणे व भारताला जागतिक उत्पादनाचे केंद्र म्हणून जगात स्थान देणे हे प्रमुख उद्देश आहेत.
आत्मनिर्भरच्या प्रभावामुळे भारतामध्ये इतर देशामधून होणारी आपात कमी झाली आहे. निर्यातीच्या बाबतीत भारताने चीनला बाजारपेठेमध्ये अनेक आघाड्यांवर मागे टाकते आहे. भारताने काही प्रमुख बाजारपेठांमधील इलेक्ट्रॉनिक्स निर्मातीमध्ये चीनचे वर्चस्व कमी करण्यास सुरुवात केली आहे. भारताने इतर देशांमधील चीनच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीचे प्रमाणही कमी केले असून त्यामध्ये ब्रिटन आणि अमेरिकेचा समावेश आहे. या देशासोबत चीनचा वाढता तणावही भारतीय उत्पादकांना फायदेशीर ठरत आहे. लंडन येथील कॅथम फापनान्क्रियत कन्सल्टिंगच्या मते, चीनच्या तुलनेत भारताची अमेरिकेला इलेक्ट्रॉनिक्स निर्यात गेल्या वर्षी नोव्हेबरमध्ये ७.६५ टक्क्यापर्यंत वाढली. नोव्हेंबर २०२१ मध्ये ती फक्त २.५१ व्क्के होती. ब्रिटनमध्ये ही वाढ ४.७९ टक्क्यांवरून १० टक्के झाली आहे.
इतर अनेक देशांमधील उत्पादकांसाठी भारत हा चीनचा पर्याय म्हणून उदयास येत आहे. भारत देत असलेल्या अनेक सोयी -सवलतीमुळे परदेशातील उत्पादक भारताकडे आकर्षित होत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या पशस्वी रणनीतीमुळे पेणान्या पढीत चार वर्षात जगामध्ये भारताचा दबदबा ठळकपणे दिसणार आहे जगामधील अनेक दिग्गज कंपन्यानी चीन सोडण्याची तयारी केली आहे. या कंपन्यांना भारत आकर्षित करीत असूत त्यांच्यासाठी भारत ही सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ आहे. अमेरिका आणि चीननंतर भविष्यामध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी ग्राहक बाजारपेठ ठरणार आहे. जगाचा केंद्रबिंद चीनकडून भारताकडे वळत आहे. त्यामुळे भारत २०२७ पर्यंत तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येईल, यात शंका नाही. सध्या जगामध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे. जागतिक स्तरावर चामडचाच्ण वस्तूच्या निर्मातीमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारतीय पादत्राणे आणि चामख्याच्या उत्पादनाची निर्यात ५.२६ डॉलर बिलिपनवर पोहोचली आहे.
एका आकडेवारीनुसार भारताने मागील दोन वर्षांत एकूण १२४०.६ दशलक्ष डॉलर्सची आयुष आणि हर्बल उत्पादने निर्यात केली आहेत. भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेमधो हा उद्योग महत्वाची भूमिका बजावतो देशाच्या एकूण जीडीपीमध्ये त्याचे ७ टक्क्यांपेक्षा जास्त योगदान आहे. परकीय चलनाच्या कमाईमध्ये या क्षेत्राचा फार मोठा वाटा आहे तसेच भारतीय दागिने संपूर्ण जगात प्रसिद्ध असून जेम अॅण्ड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अहवालानुसार अमेरिका, इसापल, हाँगकाँग व संयुक्त अरब देशामध्ये सर्वाधिक भारतीय दागिन्यांची निर्यात केली जात आहे. घराच्या सजावटी वस्त, खेळणी, कापड, तपार पोशाख, चहा व ऑटो पार्टसच्या निर्मातीमध्ये भारताचा फार मोठा वाटा आहे. चहा, आयुर्वेदिक औषधे व मसाले निर्यातीमध्येही फार मोठी वाढ नोंदविली असून त्याचे प्रमाण ३८ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.
रोमी कंडक्टर चिप्सच्या बाबतीतही नरेंद्र मोदी यांनी भारतास आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी फार मोठे पाऊल उचलले असून त्याचे परिणाम येणाऱ्या वर्षात दिसून येणार आहेत, जगामध्ये भारताचा वाढणारा दबदबा हा मोदी यांच्या नियोजनाचा भाग आहे. देशावर सर्वाधिक काळ राज्य करणान्या काँग्रेसची मानसिकता आणि नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेमधला हा ठळक फरक आहे. काँग्रेसने आपली सर्व ताकद घराणेशाहीला वाचविण्यात लावली तर मोदी यांनी आपले सर्वस्व देशासाठी
अर्पण केले. त्यामुळे देशाची धुरा, एखाद्या राष्ट्रभक्ताच्या हाती गेल्यास त्याचे
काप परिणाम होतात, हे नरेंद्र मोदी त्यांचे एक शाश्वत उदाहरण आहे.॥
चंद्रकांत लोहाणा
९८८१७१७८५६