श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक इन्स्पेक्टर शहीद झाला आहे. उधमपूरच्या बसंतगडमध्ये दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी ३:३० वाजता जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एसओजी टीमसोबत गस्त घालणाऱ्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सीआरपीएफ १८७ तुकडी उधमपूरमधील डुडू पोलिस स्टेशनच्या शीतल भागात तैनात आहे. या कारवाईत सीआरपीएफचा एक इन्स्पेक्टर शहीद झाला आहे.
कॅप्टन दीपक सिंग डोडा येथे शहीद झाले
काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफल्समध्ये तैनात असलेले कॅप्टन दीपक सिंह हे जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये शहीद झाले होते. खरं तर, डोडामध्ये झालेल्या एका छोट्या चकमकीनंतर आज परिसराची नाकेबंदी करण्यात आली आणि लपून बसलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली.
लष्कराला या परिसरात रक्ताचे डाग आढळून आले असून तीन पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, दहशतवादी असार नदीच्या किनारी भागात लपून बसले होते. दहशतवाद्यांचा शोध सुरू असताना लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कराचा कॅप्टन दीपक सिंग शहीद झाला.
यानंतर जवानांनी कॅप्टनच्या हौतात्म्याचा बदला घेतला आणि डोडा येथे सुरू असलेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला.