---Advertisement---

जयंत पाटील यांना ईडीची पुन्हा नोटीस

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांना ईडीने पुन्हा समन्स बजावला आहे. त्यानंा सोमवार दि. २२ मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना ईडीने दिल्या आहेत. आयएल आणि एफएस  घोटाळ्या प्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे.

या प्रकरणासंदर्भात जयंत पाटील यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ११ मे रोजी राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निकाल जाहीर करण्यात आला. त्याच दिवशी सकाळी जयंत पाटलांना ईडीची नोटीस प्राप्त झाली होती. या नोटीसीने राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. जयंत पाटील यांनी आपण चौकशीला समोरे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता.

दरम्यान आज पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावत त्यांना २२ मे रोजी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थीत राहण्यास सांगितलं आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment