जय श्रीरामाच्या उत्सवरंगात रंगली जळगावनगरी

जळगाव : अयोध्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा आज सोमवारी भव्य-दिव्य वातावरणात पार पडला. या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रत्येक मंडळ, चौक, संस्था, प्रतिष्ठाने, मंदिरे, दुकाने, गल्ली, घर इत्यादी ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भव्य- दिव्य प्रतिमांसह आकर्षक पताके, भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती आली.

आज अयोध्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे अभिषेक करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि लाखो लोकांनी त्यांच्या घरी आणि देशभरातील मंदिरांमध्ये दूरदर्शनवर पाहिला.

‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यादरम्यान लष्कराच्या हेलिकॉप्टरने जन्मभूमी मंदिरावर पुष्पवृष्टी केली. यासोबतच अयोध्येत उत्सवाचे वातावरण असून लोक भगवान रामाचे स्मरण करत नाचताना, गाताना आणि भजनाचा गजर करताना दिसले. संध्याकाळी शरू तिरावर दिपोत्सव करण्यात आला.

जळगाव शहरात देखील  प्रत्येक मंडळ, चौक, संस्था, प्रतिष्ठाने, मंदिरे, दुकाने, गल्ली, घर इत्यादी ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या भव्य- दिव्य प्रतिमांसह आकर्षक पताके, भगवे झेंडे आणि विद्युत रोषणाई करण्यात आली. यातून जळगावकरांना दिवाळीची अनुभूती आली.