मुंबई: मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगेंवर त्यांचेच निकटवर्तीय आरोप करत आहे. अजय बारस्कर यांनी पुन्हा मनोज जरांगेनवर आरोप केले आहे. जरांगेच्या विरोधात मी ईडी कडे जाईल असे त्यांनी म्हटले आहे.
बारस्कर म्हणाले, मनोज जरांगे पाटील कोणत्या व्यक्तीला आमदार बनायचं वचन दिलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. जरांगे पाटलांच्या नातेवाईकांकडे कसे काय 45 डंपर आले, याची चौकशी करण्यासाठी मी ईडीकडे जाणार असल्याचे अजय बारसकर यांनी म्हटले आहे. मी उद्या (25 फेब्रुवारी) त्यांच्याविरोधात सकाळी अकरा वाजता मोठा खुलासा करणार असल्याचे ते म्हणाले.
ते म्हणाले की, मी महाराज सोबत वकील पण आहे. माझ्याकडे त्यांचा पुरावा असून माझ्याकडे मनोज जरांगेंची रेकॉर्डिंग आहे, मनोज जरांगे पाटील लोणावळामध्ये बंद दाराआड का मीटिंग घेतली?असा मी प्रश्न विचारला. बंद दाराआड तुमची काय डील झाली? 14 तारखेला जी सभा झाली त्यामध्ये जरांगे पाटील यांनी सहा मागण्या केल्या होत्या. त्या सभेमध्ये तुम्ही समाजाची मागणी मान्य केली. लोणावळामध्ये सरसकट शब्द सोडून दिले. बंद दाराआड बैठक झाल्यानंतर लोणावळामध्ये सरसकट शब्द का सोडला? अंतरवली मागणीमध्ये ज्या 45 बांधवांनी आत्महत्या केली त्यांच्यासाठी सरकारी नोकरी का सुटली? याबाबत मी बोलणार आहे