जळगाव: तापमानात दिवसेंदिवस घट होते आहे, या गुलाबी थंडीमुळे धुक्याची चादर पसरली आहे. मागच्या आठवड्यापासून थंडीत वाढ झाल्याचे पाहिला मिळत आहे. थंडीमुळे सकाळी आणि रात्रीच्या वेळी जळगावकर गारठत असून, सोमवारी शहरावर धुक्याची चादर अंथरलेली राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. रविवारी, कमाल तापमान २९ अंश तर किमान तापमानही १३ अंश होते. सोमवारी देखील हीच स्थिती कायम राहील.सकाळी शहरावर धुके असेल.
त्यानंतर आकाश निरभ्र होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आहे, तर दिवसा कानांना गार हलके वारे जाणवू लागले आहे. थंडीमुळे रात्रीच्या वेळी अनेक भागात उबेसाठी म्हणून शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत. येत्या आठवड्यात किमान तापमान १४ ते १६ अंश दरम्यान राहील. कमाल तापमान २८ ते ३० अंश या दरम्यान राहील. काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील, असाही अंदाज आहे.