जळगाव : शहरात गुरुवार, 25 रोजी हातातील घड्याळानुसार दुपारी 12 वाजून 24 मिनिटे 45 सेकंदांनी व सौर घड्याळानुसार दुपारी 12 वाजता सूर्य जळगावांच्या डोक्यावर आल्याने सूर्यकिरणे प्रत्येक उभ्या वस्तुवर लंबरूप पडले व सावली इकडे तिकडे न पडता पायापाशी पडली आणि सावली गायब झाल्याचा म्हणजेच ‘शून्य सावली क्षणा’चा अनुभव जळगावकरांनी घेतला.
अमोघ जोशी यांनी तयार केलेले केीळूेपींरश्र र्डीपवळरश्र, र्र्एिींरीेींळरश्र र्डीपवळरश्र ही सौर घड्याळे (सनडायल) ठेवण्यात आली होती. हातातील घड्याळ आणि सौर घड्याळ यांच्या वेळेतील फारकामुळे हातातील घड्याळ्यानुसार 12 वाजून 24 मिनिटांनी आणि सौर घड्याळानुसार 12 वाजता शून्य सावली क्षण येण्याचे कारण, त्यामागील विज्ञानप्रात्यक्षिकाव्दारे खगोलप्रेमींनी समजून घेतले.
याप्रसंगी किरण वंजारी, विवेक उपासनी, श्रेया चौरसिया, नेहा चौरसिया, हेरंभ वाणी, सिद्धेश बडगुजर, प्रथमेश पाटील, समृद्धी वाणी, हिमांशू चौधरी उपस्थित होते.