जळगाव : जिल्ह्यातील मुक्ताई-भवानी वडोदा आरक्षित वनपट्ट्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पट्टेदार वाघ पहावयास मिळाला.दरम्यान, जळगाव वनविभागांतर्गत सात ते आठ वन परिक्षेत्र आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राण्यांना पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू नये, तसेच वनपरिसर सोडून अन्यत्र भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ जावू नये, यासाठी वन परिसरात वन्य प्राण्यांसाठी पसरट बशीच्या आकाराचे सुमारे १८० चा वर कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.
मुक्ताई भवानी वडोदा संरक्षित वनक्षेत्रात मोजक्याच ठिकाणी वन्य प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. मुक्ताई-भवानी वडोदा आरक्षित वनपट्ट्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पट्टेदार वाघाचे चित्र या ट्रॅप कॅमेऱ्यात टिपण्यात आले, अशी माहिती जळगाव जिल्हा उपवनसंरक्षक अधिकारी ए. प्रवीण यांनी दिली