जळगाव : जनतेच्या मनातलं सरकार आल्यापासून जळगाव शहरातीलर स्त्यांच्या विकासासाठी भरघोस निधी मिळाला त्यात आज अजून ४० कोटीची भर पडली. सर्व रस्ते हे काँक्रिटीकारणात व उत्तम दर्जाचे व्हावे हाच आपला प्रयत्न असल्याचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले.
राज्याच्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्प अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जळगाव शहराच्या मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४० कोटी एवढा निधी मिळाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून तसेच मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या सगळ्यांच्या सहकार्यातून हा निधी मिळाल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली.
रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर झालेला निधी
मंजूर झालेल्या कामांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. पिप्राळा ते सावखेडा ८.५ ५कोटी, मोहाडी रस्ता-६ कोटी, नेरी नाका ते झाशीची राणी पुतळा ३ कोटी, झाशीची राणी पुतळा ते टॉवर ३ कोटी, गिरणा पंपिंग रस्ता १.५ कोटी, हायवे समांतर रस्ता (खोटे नगर ते बांबोरी ब्रिज) ३ कोटी, हायवे समांतर रस्ता (अजिंठा चौफुली ते खेडी) ३ कोटी, हायवे समांतर रस्ता (बेंडाळे स्टॉप ते खोटे नगर) ३ कोटी, शिवाजीनगर ते ममुराबाद रस्त्याला जोडणारा मार्ग ६ कोटी, शिवाजीनगर पोलीस चौकी ते जुने हुडकोवर तीन कोटी या कामांसाठी खर्चाचा समावेश आहे.