जळगावकरांसाठी आनंदाची बातमी, बालकल्याण विभागातर्फे खान्देश महोत्सवास प्रारंभ

जळगाव:  महापालिकेतर्फे सलग चार वर्षापासून घेण्यात येत असलेल्या खान्देश महोत्सवातून महिला आत्मनिर्भर होतील असे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवार २९ डिसेंबर रोजी व्यक्त केले. जळगाव शहर महापालिकेच्या महिला व बालक कल्याण विभागातर्फे चार दिवशीय खान्देश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उ‌द्घाटक त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित, आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत, उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त अविनाश गांगोडे, सहाय्यक आयुक्त अश्विनी गायकवाड, अभिजीत बाविस्कर, गणेश चाटे, माजी नगरसेवक कुंदन काळे, अॅड. पोकळे आदी उपस्थित होते.प्रास्ताविक उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी केले. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी महोत्सवाच्या आयोजनाची भूमिका विशद केली. आभार आमदार सुरेश भोळे यांनी मानले.

मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ व्हावी : आमदार सुरेश भोळे
महिला बचत गट व शेतकऱ्यांच्या विद्या आणि सरस्वतींचा संगम म्हणजे आयुक्त
महापालिकेच्या आयुक्तत्र डॉ. विद्या गायकवाड यांच्याबाबत गौरवोद्‌गार काढतांना खासदार उन्मेश पाटील म्हणाले की, ज्याच्या संकल्पनेतून हा खान्देश महोत्सव होत आहे त्याचं नाव विद्या आहे, त्यांना सरस्वतीही लाभली आहे. मनपाच्या माध्यमातून महिला बचत गटांसाठी हा महोत्सव, मुलांना शिष्यवृत्तीचे वाटप करत लहान लहान घटकांसाठी काम करत आहेत याचा अभिमान असल्याचे सांगीतले.

मालाच्या थेट
विक्रीसाठी फिरती व अशी तयार कायमस्वरूपी बाजारपेठ व्हावी. यासाठी माझ्यासह पालक मंत्री, जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपाच्या आयुक्त प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सुरेशभोळे यांनी दिले.

खान्देशाच्या भरतीचे मुंबईकरांना आकर्षण : पालकमंत्री
मी मुंबईला असलो की तेथील मान्यवरांना खान्देशाच्या वांग्यांच्या भरिताचा मेन्यु देत असतो. भरीताचा आस्वाद घ्यावा तो जळगावच्या वांग्यांचाच अशा प्रतिक्रिया त्यांच्याकडून मिळत असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगीतले.

डायनॅमिक पालकमंत्री
यावेळी बोलताना खासदार उन्मेश पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आमचे डायनॅमिक पालकंमत्री असा उल्लेख करत भाषणास सुरवात केली. राज्यात सर्वाधिक डिपीसीचा निधी विकास कामांसाठी मनपा, जि.प. व प्रशासनाला देण्याचा नवा पायंडा पालकमंत्र्यानी पाडला आहे. या महोत्सवासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे. पालकमंत्री, ना. गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांतून जिल्ह्यातील विविध प्रकल्प पूर्णत्वास नेत असल्याचे सांगीतले.

…तर भारत आर्थिकदृष्ट्या सक्षम : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड
खान्देश महोत्सव ही जळगावकरांसाठी एक खास मेजवानी आहे. महिला बचत गटांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासह त्यांना रोजगार मिळतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर भारताला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यापासून कोणीच कोणीच थांबवू शकणार नाही. हा प्रयत्न यातून करत असल्याचे आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी सांगीतले.१७ हजार महिलांना लाभ उपायुक्त निर्मला गायकवाड

खासदार उन्मेश पाटील
या महोत्सवातून १७ हजार महिलांना रोजगार मिळाला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी सांगीतले.