जळगाव : ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ व आरोग्यवर्धिनी केंद्रात बीएएमएस डॉक्टर भरण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता जळगाव महापालिकेस आपला दवाखाना सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.याठिकाणी आहेत आपला दवाखाना केंद्र ऑक्सिजन पार्क मुक्ताईनगर, बालवाडी विजय कॉलनी, गणेश कॉलनी मनपा शाळा क्रमांक १५, गेंदलाल मिल, बालवाडी कांचन नगर, शनिपेठ चौगुले प्लॉट मनपा शाळा क्रमांक २२, जोशी पेठ जुने जळगाव मनपा शाळा क्रमांक २४, मनपा शाळा क्रमांक ५० रामेश्वर कॉलनी, मनपा शाळा क्रमांक ४८ सोमानी मार्केट, पिंप्राळा, मनपा बालवाडी क्रमांक पाच, शिव कॉलनी मनपा हॉल, पोलीस कॉलनी सुप्रीम कॉलनी, मनपा हॉल राधाकृष्णनगर,होणार आहेत. महापालिकेच्या जागेवर दुरुस्ती करण्यात बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना
बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांची नियुक्ती करण्याची अट शासनाने टाकली होती. त्यामुळे महापालिकेतर्फे आपला दवाखाना सुरू करण्यात अडचण येत होती. याबाबत महापालिकेने शासनास पत्र दिले होते. त्याची दखल घेत शासनाने ही अट मागे घेत बीएएमएस डॉक्टरांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे. यानुसार महापालिकेतर्फे जळगाव शहरात तीन आरोग्यवर्धिनी केंद्र व १४ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणार आहे. त्यासाठी म हापालिकेने स्वतःच्या इमारतीत ११ जागा तयार केल्या आहेत. त्यापैकी एक दवाखाना सुरू करण्यात आला आहे.येऊन दवाखान्यांसाठी लागणारे साहित्य, कर्मचाऱ्यांची भरती केली आहे.सिव्हील सर्जन भरणार पदे आपला दवाखान्यासाठी आवश्यक असलेली बीएएमएस डॉक्टरांची भरती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत करण्यात महापालिकेने प्रस्ताव दिला होता. महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी रजेवर असल्याने ती भरती जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यामार्फत भरण्यात यावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.शहरात आता पूर्ण १७ दवाखाने विविध भागात सुरू