जळगाव : मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी असलेल्या जळगाव जंक्शन स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी डाऊन साईडला सरकत्या जिन्यासह बोगीदर्शक फलकासह विविध सुविधा देण्यात येत आहेत. यात दिव्यांग, ज्येष्ठ प्रवासी नागरिकांच्या सोयीसाठी उद्वाहन (लिफ्ट) तसेच वरच्या बाजूस जाण्यासाठी सरकते जिने बसविण्यात आले आहेत. यात उतरण्यासाठीदेखील सरकत्या जिन्यांची तसेच बोगी शयनयान व्यवस्थादर्शक बोर्डची व्यवस्था केली जात आहे.
भुसावळ विभागांतर्गत मध्य रेल्वे मार्गावर जळगाव जंक्शन स्थानकाची स्थापना स्वातंत्र्य पूर्व काळात १८६० मध्ये झाली. त्यात कालमानानुसार प्रवासी सुविधामध्ये अनेक बदल झाले असून पूर्वी चारच फलाट होते. २०१४ नंतर टप्प्याटप्याने ५ आणि ६ वा फलाट कार्यान्वित झाला आहे. २०१८-१९ दरम्यान टिकिट घराबाहेर, स्थानकावर जाण्यासाठी एक सरकता जिना, तसेच २, ५ आणि ६ व्या फलाटावर जाण्यासाठी उद्वाहन (लिफ्ट) आणि ३ नंबरच्या फलाटावर सरकता जिन्याची सुविधा प्रवाशांसाठी केली आहे. लवकरच ३ नंबर फलाट तसेच बाहेरील बाजूस पोलीस चौकीच्या समोर उतरण्यासाठी देखील सरकत्या सर्व फलाटांवर येणाऱ्या व जाणाऱ्या नंबरची माहिती लहान तसेच मोठ्या फ्लेक्सवर दोन ते तीन ठिकाणी दर्शवली जात आहे.
आगामी काळात फलाटांच्या शेवटच्या दोन्ही बाजूस देखील लावण्यात येणार आहे. रेल्वे स्थानक इमारतीचे देखील नूतनीकरण आगामी काळात होणार आहे. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रवासी गाड्यांची माहिती मिळण्यासाठी १२ बाय १८ आकारातील टिव्ही फ्लेक्स पोलीस चौकी तसेच आरक्षण कक्षाच्या बाजूस उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. –
कौस्तुभ चौधरी, व्यवस्थापक, जळगाव