जळगावमध्ये कृष्ण जन्मोत्सव जल्लोषात; साकारण्यात आली ऑलम्पिक स्पर्धेची थीम

जळगाव : संपूर्ण महाराष्ट्रात आज दहीहंडी उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जळगाव शहरातही  विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः ऑलम्पिक स्पर्धेची थीम यावेळी साकारण्यात आलेली आहे.

जळगाव शहरातही नेहरू चौक, सागर पार्क, शिव तीर्थ मैदान, नवी पेठ, सुभाष चौक, प्रभात चौक अशी विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेषतः ऑलम्पिक स्पर्धेची थीम यावेळी साकारण्यात आलेली आहे.

गोविंदांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन
सालाबादप्रमाणं प्रत्येक ठिकाणी हा गोविंदाचा उत्सव साजरा करणं ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. याला पुढे नेण्याचं काम हे गोविंदा करत असतात. परंतु, त्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि दहिहंडीचा उत्सव साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे केले आहे.

तसेच सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, लाडका भाऊ योजना आणली, लाडका शेतकरी योजना देखील आणली आणि आता लाडका गोविंदा योजना देखील आणली. प्रो गोविंदा हा खेळही सुरु केला आहे. या गोविंदांसाठी वीमा काढला असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं.