---Advertisement---
जळगाव : वैद्यकीय तपासणी फी मागितली म्हणून चार जणांनी डॉक्टरला फायटर व लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत डॉक्टरचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. ही घटना आयोध्या नगरात घडली असून, हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील भिकमचंद जैन परिसरातील रहिवासी डॉ. योगेश बसेर (४५) यांचे अयोध्या नगरात दावाखाना आहे. वैद्यकीय व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे डॉ. बसेर हे मंगळवार, २७ रोजी रात्री ९.३० वाजता अयोध्या नगरातील दवाखान्यात होते.
दरम्यान, बाब्या यादव, गोलू जोनवाल, सुबोध कोळी व हर्षल ‘पुर्ण नाव माहित नाही’ सर्व रा.अयोध्या नगर, जळगाव हे दारूच्या नशेत आले. त्यावेळी डॉ. बसेर यांनी दवाखान्याची फी मागितली. याचा राग आल्याने चौघांनी डॉ. बसेर यांना शिवीगाळ करत फायटर, लोखंडी पाईप आणि चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत डॉ. बसेर यांचे नाक फ्रॅक्चर, तर डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी बुधवार, २८ रोजी सायंकाळी साडेसात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---Advertisement---