जळगावमध्ये बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध; बाजारपेठा बंद

जळगाव : बांगलादेशातील हिंदू समुदायावर करण्यात येत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी जळगाव शहरात बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.  सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली आहे.

गेल्या 5 ऑगस्टला वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि आपला देश सोडून त्या भारतात आल्या. यानंतर, बांगलादेश राजकीय अस्थिरतेतून जात आहे. मंगळवार, 13 रोजी अल्पसंख्यक हिंदू आणि बांगलादेशी सैनिकांमध्ये चकमक उडाली होती.

हिंदू लोक देशातील हिंसाचारात बेपत्ता झालेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पोस्टर्ससह निषेध करत होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस राहत असलेल्या ढाका येथील जमुना स्टेट गेस्ट हाऊसबाहेर हे सर्व हिंदू निदर्शन करत होते.

दरम्यान, या अत्याचाराच्या निषेधार्थ आज देशव्यापी बंदची हाक देण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर आज शुक्रवारी जळगाव शहरात बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य निषेध रॅली काढण्यात आली आहे.

बांगलादेशमध्ये जे घडले ते चिंताजनक : पंतप्रधान मोदी
बांगलादेशातील हिंदूंची सुरक्षितता सुनिश्चित व्हायला हवी. भारताला शेजारील देशांमध्ये शांतता हवी आहे. बांगलादेशमध्ये जे घडले ते अतिशय चिंताजनक आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटेल आहे.