जळगाव : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अर्थात दुपारी ३ वाजेच्यापर्यंत अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. महायुतीच्या जळगाव व रावेर मतदारसंघाच्या उमेदवार आज २५ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित अर्ज दाखल करणार होते. परंतु, त्यांना उशीर होत असल्याने गैरसोय होऊ नये, म्हणून दोघा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून, महायुतीच्या शक्तीप्रदर्शन रॅलीला सुरवात झाली आहेत. या रॅलीत महायुतीच्या अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली आहे.
तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या रॅलीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, महायुतीचे समन्वयक आमदार मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव जिल्हाध्यक्ष व महायुतीचे समन्वयक संजय पवार, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के. अण्णा पाटील,
माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अमोल हरिभाऊ जावळे , जळगाव महानगर जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे, भाजपा रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजपा जळगाव लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ.राधेश्याम चौधरी, शिवसेना जळगाव जिल्हाप्रमुख निलेश पाटील , शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, शिवसेना जळगाव जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, मनसे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मीनल पाटील, सोनाली पाटील, शिवसेनेच्या सरिता माळी-कोल्हे , गणेश सोनवणे , RPI आठवले गटाचे आनंद खरात , आठवले RPIचे अनिल अडकमोल, RPI कवाडे गट राजू मोरे , लहूजी सेना दिनेश खरात , श्री.सुर्यवंशी (रासप) यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना उपस्थिती लावली आहे.