जळगावमध्ये मौर्या ग्लोबल कंपनीला भीषण आग, काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन ?

जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत एकूण ३५ कामगार होते त्यापैकी १७ कामगारांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी १८ कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, रुग्णालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट दिली.

आगग्रस्तांना शासनातर्फे मदत – मंत्री गिरीश महाजन 
आगग्रस्तांना शासनातर्फे मदत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच १७ कामगारांना बाहेर काढण्यात आले असून, अजूनही काही कामगार आत अडकले असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.