जळगावमध्ये सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली; असे आहेत दर

जळगाव : जळगावमध्ये आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोने-चांदीने दर पुन्हा वाढत आहेत. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी सोने ३०० रुपये तोळा तर चांदी किलोमागे दोन हजार रुपयांनी महागली.

ही दरवाढ इस्त्राइलने केलेल्या बॉम्बहल्ल्याचे पडसाद असल्याचे व्यावसायिकांसह या क्षेत्राचा अभ्यास असलेल्या जाणकारांचे म्हणणे आहे. दरात आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवलेली आहे.

गेल्या आठवड्यात सोमवारी सोन्याचे प्रतितोळ्याचे दर ७४९०० (जीएसटीसह ७७१४७) तर चांदी ९२ हजार रुपये किलोवर गेली होती. मात्र, त्यानंतर घसरून सोमवारी चांदी ९१ हजार तर सोने ७२४०० रुपये तोळा झाले होते.

मंगळवारी चांदी ९३ हजार (जीएसटीसह ९५७९०) रुपये किलो तर सोने ७२७०० रुपये तोळा झाले. ही दरवाढ इस्त्राइल हल्ल्याचा परिणाम असल्याचे चांदीचे घाऊक व्यापारी यांनी सांगितले.