जळगाव : उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि धुळे जिल्ह्यापासून अवघ्या 90 ते 120 कि.मी अंतरावर असलेल्या नंदुरबारमध्ये वराह (डुकर) आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात वराह ठार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये देखील खबरदारी म्हणून त्याआधीच वराह लसीकरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त विभागाने दिली आहे.
जळगाव शहर तसेच जिल्हा हद्दीपासून सुमारे 150 ते 175 किमी अंतरावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये अफ्रिकन स्वाईन फिवरची लागण मोठ्या प्रमाणात झाली आहे. यापूर्वी देखील गेल्या 20/22 वर्षापूर्वी तसेच कोरोना संसर्ग काळादरम्यान कोंबड्यांवरील राणीखेत आजाराचे संक्रमण झाले आहे.
या दरम्यान राज्य शासनाच्या निर्देशानुसार पशुसंवर्धन विभागाकडून पोल्टीफार्मवरील हजारो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या होत्या. तसेच जळगाव जिल्हा परिषद व पशुसंवर्धन विभागातर्फे सुमारे 15 रॅपिड ॲक्शन पथके 2021-22 दरम्यान कोंबड्याचे लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पाठवण्यात आले होते. ही सर्व पाश्वभूमी पहाता वराहांपासून आफ्रिकन स्वाइन फिवरची लागण प्रादूर्भाव होवू नये यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने वराह मारण्याचे आदेश देण्यात आले असून वराहाचे मटन खाण्यावर देखील बंदी करण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात पांढरे अमेरिकन वराह पालन व्यवसाय बऱ्याच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर आहे. वराह पालन करणाऱ्यांकडे 9 हजार 599 वरांहांची संख्या आहे. वराहांपासून आफ्रिकन स्वाईन फिवर प्रादूर्भाव होवू नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभाग बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पथकाकडून जिल्ह्यातील सर्व 15 तालुकास्तरावर वराहांचे लसीकरण मोहिम राबविण्यात आली आहे.
= डॉ.वाहेद तडवी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि.प.जळगाव
अफ्रिकन स्वाईन फिवरची लक्षणे ताप, खाणे बंद होणे, त्वचेवर किंवा अंतर्गत अवयवांमध्ये रक्तस्राव होणे, कोणतेही लक्षण न दाखवता मृत होणे आदी लक्षणे आहेत. मानवामध्ये याचा प्रसार होत नाही. परंतु या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून वराह लसीकरण करण्यात आले आहे.
= डॉ.श्यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग. जळगाव.