जळगाव : जळगावसह धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा मुंबईच्या आयएमडीने दिला आहे. यानुसार जळगाव व धुळे जिल्ह्यात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार आहेत.
वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. यासोबतच नाशिक व नंदुरबार जिल्ह्यात पुढील 3 ते 4 चार तास धोक्याचे असल्याचे वर्तविण्यात आले आहे.
त्यामुळे नाशिक, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील नागरीकांनी सावध रहावे. विजांचा कडकडाट होणार असल्याने वीजेचे खांब, झाडे, जुन्या इमारतींजवळ थांबू नये. वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 राहणार असल्याने वाहनांचा वेग कमी ठेवावा. वीजेचे पोल , तारा, विज रोहीत्र यांच्याजवळ थांबू नये.
आज शुक्रवारी दुपारी 5 वाजेपर्यंत उन्हाचा चटका बसत होता. मात्र सायंकाळी वातावरणात अचानक बदल होत जोरदार वारा सुटला. यामुळे शहरातील विविध भागातील झाडांच्या वाळलेल्या लहान फांद्या तुटल्यात. तर रस्त्यावर धुळ उडत होती.
पहाटेही काही भागात तुरळक पाऊस पडला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.
मनपासह जिल्हाधिकारी कार्यालय सज्ज वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट व पाऊस होणार असल्याच्या आयएमडीच्या सावधगीरीच्या इशाऱ्यानंतर महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा सजग झाली आहे. नागरीकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.