जळगाव : पोलीस दप्तरी कुविख्यात असलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (25, रा.काट्या फाईल, शनिपेठ) यास स्थानबद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गुन्हेगार शहजाद खान याची येरवडा, पुणे कारागृहात रवानगी करण्यात आली. शहजानखानविरोधात सहा गुन्हे शनिपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान याच्यावर वेगवेगळ्या स्वरुपाचे सहा गंभीर गुन्हे दाखल असण्यासह त्याच्यावर तीन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा न झाल्याने शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी त्याच्यावर एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवल्यानंतर त्यांनी स्थानबद्धतेचे आदेश पारीत केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन या प्रस्तावासाठी पोलिस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.