जळगाव : जळगावच्या गुन्हेगारी पटलावरील बावरी गँगवर नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांनी मोक्कांतर्गत कारवाई गेल्याने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नूतन पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांनी जिल्ह्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मोक्का, एमपीडीए व हद्दपारीच्या कारवायांना वेग दिल्याने गुन्हेगारांच्या तंबूत प्रचंड घबराट पसरली आहे. जिल्ह्यात नववर्षात प्रथमच मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून आगामी काळात आणखी काही टोळ्यांवर अशाच पद्धत्तीने कारवाया होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
या आरोपींना लागला मोक्का
मोनुसिंग जगदिशसिंग बावरी (23, रा.सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), मोहनसिंग जगदिशसिंग बावरी (19, रा.सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), सोनुसिंग जगदिशसिंग बावरी (25, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), जगदिशसिंग हरिसिंग बावरी (52, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव), सतकौर जगदिशसिंग बावर (45, रा. सदगुरु कॉलनी, शिरसोली नाका, जळगाव) यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपींचा आता नाशिक कारागृहात वर्षभर मुक्काम असणार आहे. आरोपींच्या टोळीविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याने मोक्कांतर्गत कारवाईसाठी एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव दाखल केल्यानंतर तो नाशिक आयजींकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर सोमवारी त्यास मंजुरी मिळाली.
प्रस्तावाकामी यांचे योगदान महत्त्वाचे
गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक किसनराव नजनपाटील, पोलीस अंमलदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनील पंडीत दामोदरे तसेच एमआयडीसी निरीक्षक जयपाल हिरे, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार सचिन मुंडे, योगेश बारी, सचिन पाटील यांनी योगदान दिले