जळगावात चांगल्या पावसाचा अंदाज; हवामान विभागाचा इशारा

तरुण भारत लाईव्ह|५ सप्टेंबर २०२३| गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे. जळगावकर उकाड्याने हैराण झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची सगळेच वाट पाहत आहे. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये जळगाव मध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान हवामान विभागाकडून सांगण्यात आले की बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने पाऊस परतेल. मागील दोन दिवस राज्यातल्या काही भागात पाऊस झाला होता. आजपासून पुढचे दहा दिवस चांगला पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगावातील तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे उकाडाही वाढला आहे. रविवारी पारा हा 36 अंशांवरती होता. त्यामध्ये सोमवारी दोन अंशाने घसरण झाली होती. पुढील दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पावसाळ्याच्या तीन महिन्यात २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणे खाली झाले असून येणाऱ्या दिवसात पाऊस न झाल्याने पाणी टंचाईची शक्यता नाकारता येणार नाही.