---Advertisement---

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; फोडलं बंद घर, गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव : शहरातील पिंप्राळा भागातील समर्थ नगरात बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी 63 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

जळगाव शहरातील पिंप्राळा भागातील समर्थ नगरातील रहिवासी संगीता काशिनाथ कोळंबे ( 43) या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. 25 एप्रिल रोजी त्या घर बंद करून नातेवाईकाकडे गेलेल्या होत्या. हीच संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 63 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना बुधवारी 29 मे रोजी सकाळी 8 वाजता उघडकीला आली. त्यानंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत हे करीत आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment