जळगावात दोन गटात तुफान हाणामारी, सात जणांवर गुन्हा दाखल, काय आहेत कारण ?

जळगाव : शहरातील सुप्रिम कॉलनी परिसरातील सागर अपार्टमेंटजवळ कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. ही घटना शनिवार, १७ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत एमआयडीसी पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील सुप्रिम कॉलनीतील सागर आपर्टमेंटजवळ दुचाकीला कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात हाणामारी झाली. हा वाद वाढतच असल्याने त्या दोन्ही गटाकडून एकमेकांना मारहाण केल्यानंतर त्यांनी तेथील दगड उचलून दोन दुचाकींचे नुकसान केले.

याप्रकरणी दत्तात्र्य शरद कोळी (वय-१९), गोपाळ संभाजी पाटील (वय-१९, दोघ. रा. सुप्रिम कॉलनी), सचिन प्रभाकर सोनवणे (वय १८, रा. खुबचंद साहित्या नगर), राकेश कैलास पाटील (वय २३, रा. नितीन साहित्या नगर), सैय्यद अब्दुल रहिम अली मोहम्मद अली (वय २४, रा. मारुळ ता. यावल) कैसीम शेख शाकीर शेख (वय २५, रा. नशेमन कॉलनी) यांच्यासह एक विधी संघर्षीत बालक असे एकुण सात जणांविरुद्ध शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहे.