तरुण भारत लाईव्ह न्यूज । उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून दिवसेंदिवस उन्हाचे तापमान आता वाढत जाणार आहे. या उन्हाचे चटके पशु पक्षांना सहन करावे लागणार आहे. पक्षांचा उन्हाळा सुकर व्हावा या सामाजिक उद्देशाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगाव तर्फे “पक्षांसाठी दाणा पाणी” उपक्रम अंतर्गत आ. सुरेश भोळे यांच्या हस्ते परळ वाटपचे वाटप करण्यात आले.
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ जळगावतर्फे पक्षांसाठी दाणापाणी हा उपक्रम काव्यरत्नावली चौक या ठिकाणी राबवण्यात आला.स्व. आबासाहेब मोरे यांच्या संकल्पनेतून व राज्याध्यक्ष प्रमोद दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जळगाव शहरात राबविण्यात आला. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असून दिवसेंदिवस उन्हाचे तापमान आता वाढत जाईल. या तीव्र उन्हाचे चटके सर्व प्राणीजनमात्रांना सहन करावे लागतात. या तीव्र उन्हाचा चटका पक्ष्यांना झळ सोसावी लागत आहे. या पक्षांना उन्हापासून वाचवण्यासाठी त्यांना दाणापाणी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते नागरिकांना मातीचे परळ वाटप करण्यात आले. आ. भोळे यांनी सांगितले की, परदेशी पक्षी आपल्याकडे भरपूर येत असतात. अशा पक्षांना भर उन्हाळ्यात वाचवणे खूप गरजेचे आहे. यासाठी धान्याची एक परळ व पाण्याची एक परळ त्यांना प्रत्येकाने उपलब्ध करून दिली पाहिजे तरच निसर्गाचा पर्यावरण समतोल राखला जाईल. आणखी मोठ्या संख्येने परळ उपलब्ध करून देण्याचे दातृत्व देखील त्यांनी स्वीकारले. याप्रसंगी मातीच्या मोठ्या आकाराच्या पक्क्या परळ नागरिकांना वाटप करण्यात येऊन पक्षी संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. उपक्रमाचा उद्देश राज्य उपाध्यक्ष मनिषा पाटील यांनी मांडला. याप्रसंगी राज्य कार्यकारणी सल्लागार तनुजा मोती, जिल्हा उपाध्यक्ष ज्योती राणे , नूतनतास खेडकर, कार्याध्यक्ष नेहा जगताप, किमया पाटील , शशी शर्मा, रेणुका हिंगु, कांचन पाटील, आशा मौर्य, नीता वानखेडकर, नयना जगताप, ज्योती नलगे, माधुरी वाणी, हर्षा गुजराती हे उपस्थित होते. प्रास्ताविक ज्योती राणे यांनी केले व आभार नेहा जगताप हिने मानले.