---Advertisement---

जळगावात पुन्हा धक्कादायक घटना! महिलेला केळीच्या बागेत ओढले अन्… काय घडलं

---Advertisement---

जळगाव : राज्यसह जिल्ह्यात महिलांवरील अत्याचारचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच शेताजवळून पायी जाणाऱ्या विवाहितेवर बळजबरीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवाय नराधमाने विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिली. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून एकाविरोधात मुक्ताईनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सूत्रानुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या विवाहिता ३ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०४.३० वा. सुमारास शेताजवळुन जात होत्या. त्यावेळी संशयित आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ याने पीडित महिलेचा हात पकडुन केळीच्या बागेत ओढत नेले. पीडित महिलेवर बळजबरीने अत्याचार केला.

शिवाय  शिवाय नराधमाने विवस्त्र अवस्थेतील फोटो काढून लोकांना दाखविण्याची धमकी दिली. याबाबत पीडित महिलेने मुक्ताईनगर पोलीसात फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी बाळकृष्ण दयाराम वाघ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास स. पो. नि संदीप दुनगहु करीत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment