जळगाव । जळगाव शहरात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला गालबोट लागलं आहे. या निषेध मोर्चात काही तरुणांकडून उघडे असलेले बाईकच्या शोरूमवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत असे की, बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने आज जळगाव जिल्हा बंदची हाक देण्यात आली. यादरम्यान, जळगाव शहरात हिंदू समाजाच्या वतीने आज सकाळी निषेध मोर्चा काढण्यात आला. याच दरम्यान मोर्चात काही तरुणांकडून उघडे असलेल्या बाईकच्या शोरूम वर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला.
दगडफेकीच्या घटनेनंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ करण्यात आला असून सदर घटनेमुळे मोर्चात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.