---Advertisement---

जळगावात मारहाण करीत पाच हजार लूटले ,रिक्षा चालकासह दोघांना अटक

by team
---Advertisement---

जळगाव :  रिक्षा चालक आणि त्याच्या साथीदाराने दमदाटी करत मारहाण करीत दोघा भावांच्या खिशातून पाच हजाराची रोकड लूटल्याचा प्रकार रविवार, १० रोजी रात्री १२.१५ वाजता खेडी पेट्रोलपंपाजवळ घडला होता. एमआयडीसी पोलिसांनी रिक्षा चालकासह दोघांना अटक केली आहे.मारहाण करीत रोकड लूटली निलेश रामलाल शिलारे हा भावासह खेडी पेट्रोल पंपाजवळ उभा होता.

महामार्गावरुन येत असलेली प्रवासी रिक्षा शिलाले बंधूजवळ थांबली. रिक्षा चालक तसेच त्याचा एक साथीदाराने निलेश तसेच त्याच्या भावाच्या खिशातून जबरीने पैसे काढण्याचा प्रयत्न केला. याला विरोध करताच शिलाले बंधूना चालकासह साथीदाराने मारहाण करत दमदाटी केली व खिशात हात टाकून पाच हजाराची रोकड काढुन घेत रिक्षासह दोघे पसार झाले होते. निरीक्षक बबन आव्हाड यांना संशयितांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई ही कारवाई जळगाव पोलीस
अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, दत्तात्रय पोटे, निलेश गोसावी, दीपक जगदाळे, अतुल वंजारी, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, राहुल पाटील, ललित नारखेडे, साईनाथ मुंढे आर्दीच्या पथकाने केली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment