जळगाव : येथील पवन फाउंडेशन आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (मुंबई) तर्फे रविवार (ता. ११ ) सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात एक दिवसीय १७ वे बहिणाबाई सोपानदेव खानदेश मराठी राज्य साहित्य संमेलन होणार आहे. रविवारी सकाळी दहाला उद्घाटन होणार असून, आमदार सुरेश भोळे, संमेलनाध्यक्ष साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे असतील.विशेष आमंत्रित खासदार उन्मेष पाटील, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे धनंजय गुडसुरकर, पुष्पराज गावंडे, नाट्यछटाकार अरविंद नारखेडे ,कवी संमेलनाचे अध्यक्ष राजेंद्र दिघे असतील.कवी संमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कवी वा.ना.आंधळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, जयश्री महाजन, माजी नगरसेवक अमित काळे असतील.
साहित्यिका माया दिलीप धुप्पड स्वलिखित काव्यचित्र प्रदर्शन होईल. दुपारी मराठी भाषा अभिजाततेपासून दूर का आहे या विषयावर परिसंवाद होईल.सायंकाळी समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.वासुदेव वले असतील. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांच्या नातसुना पद्माताई चौधरी व स्मिताताई चौधरी, निवृत्त प्राध्यापिका कमल पाटील.सुनील इंगळे (डोंबिवली ), प्रा.संध्या महाजन,विशाखा देशमुख,साधना लोखंडे, पत्रकार तुषार वाघुळदे, कवी अशोक पारधे,शीतल पाटील, कवी संजय पाटील,किशोर नेवे उपस्थित राहतील.कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहून साहित्यिक व काव्य रसिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक पवन चॅरिटेबल ट्रस्ट जळगाव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ,व संमेलनाचे निमंत्रक डॉ.विलास नारखेडे, लिलाधर नारखेडे.
कार्याध्यक्ष तुषार वाघुळदे व विजय लुल्हे ,आयोजक रघुनाथ राणे व डॉ.संजय पाटील तसेच युवा विकास फाउंडेशनच्या कार्यकारिणी केले आहे.