जळगावात वेश्या व्यवसायासाठी परप्रांतीय तरुणींचा वापर, पाच पीडितांची सुटका

जळगाव ः लॉजचा परवाना नसताना परप्रांतीय तरुणींना आणून त्यांच्याकडून चोरून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या दोघांविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या छापेमारीत पाच परप्रांतीय तरुणींची सुटका करण्यात आली. याप्रकरणी सागर नारायण सोनवणे शाम विश्वास बोरसे (दोन्ही रा.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांना एमआयडीसी सेक्टरमधील एका हॉटेलमध्ये अवैधरीत्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी छापेमारी केली.

यावेळी पोलिसांना पश्चिम बंगाल राज्यातील 20 ते 25 वयोगटातील पाच तरुणी आढळल्याने त्यांची सुटका करण्यात आली. रविवार, 3 डिसेंबरच्या सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे सचिन सुरेश साळुंके (35, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.