---Advertisement---

जळगावात हिवाळ्याचे आगमन कधी होणार?

by team
---Advertisement---

राज्यामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली आहे.जळगाव जिल्ह्यात मागच्या चार पाच दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे,आता येणाऱ्या पुढच्या आठवडाभर तरी जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असून यातच तापमान वाढीसह उकाडा वाढला आहे. जळगावातील तापमानाचा पारा ३३ ते ३४ अंशावर जात असून येणाऱ्या काही दिवसांत शहरातील तापमानाचा पारा ३५ अंशावर पुढे जाण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काही दिवस जळगावकरांना घामाच्या धारा लावणारे ठरणार आहेत.

हिवाळ्याचे लवकरच होणार आगमन

यावर्षी हिमालयासह उत्तर भारतातून मान्सून लवकरच मागे सरकला आहे. त्यामुळे हिमालयातील काही राज्यांमध्ये लवकरच बर्फवृष्टीला सुरुवात होऊ शकते.ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय होऊन हिवाळ्याचे आगमन होऊ शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment