---Advertisement---

जळगाव : अल्पवयीन मुलीवर अत्याचार

by team
---Advertisement---

जळगाव : शाळेच्या गेट जवळ असलेल्या चौदा वर्षीय मुलीला संशयिताने दुचाकीवर बसविले. खेडी (ता. भुसावळ) येथील त्याच्या मित्राच्या रूमवर तिला नेत तिच्यावर अत्याचार केला. ही खळबळजन घटना शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ जानेवारी रोजी ११.३० ते ५ वाजेदरम्यान घडली होती . मुलीने हा प्रकार घरात सांगितला. याप्रकरणी बुधवार २८ रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित हर्षल दीपक सोनवणे (वय २१ रा. भुसावळ) याला ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलगी शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत आहे.

विद्यालयाच्या गेटजवळून ही मुलगी जात असताना संशयिताने तिला त्याच्या दुचाकीवर बसविले. त्यानंतर त्याच्या मित्राच्या रुमवर नेले. याठिकाणी तिच्यावर त्याने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा या मुलीला त्याने विद्यालयाच्या गेटजवळ सोडून देत पसार झाला. तक्रार प्राप्त होताच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पोलिसांनी तपासाचे चक्रे फिरवित संशयिताला बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात केली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment