जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षक निश्चित

जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता भारत निवडणूक आयोगाने उमेदवार खर्च नियंत्रणासाठी जळगाव लोकसभा मतदारसंघा करिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून भारतीय महसूल सेवेतील अधिकारी कुमार चंदन यांची नियुक्ती केली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भारतीय महसूल सेवेतील अधिकारी संदीपन खान यांची नियुक्ती केली आहे.
निवडणूक खर्च निरीक्षक कुमार चंदन यांचे १८ एप्रिल रोजी जळगाव लोकसभा मतदार संघात व संदीपन खान यांचे रावेर मतदार संघात आगमन झाले आहे. कुमार चंदन हे जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहेत. त्यांचा निवास अभंग अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असून त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असेल. तर चंदन यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970670 हा आहे. तर संदीपन खान हे रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणार आहे. खान यांचा निवास पोवाडा अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. तर त्यांचे कार्यालय राजगड अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे असणार आहे. खान यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8275970671 हा आहे.निवडणूक निरीक्षक यांच्याशी दिलेल्या भ्रमणध्वनीवर अथवा कार्यालयीन पत्त्यावर संपर्क साधता येईल असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.