जळगाव : एमआयडीसीमधील (मौर्या ग्लोबल लि.) केमिकल कंपनीला आज बुधवारी सकाळी भीषण आग लागली. कंपनीत काम सुरु असताना ही दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तर आगीमुळे मोठा स्फोट होऊन त्यामधील केमिकलने देखील पेट घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत एकूण ३५ कामगार होते त्यापैकी १५ कामगारांना बाहेर काढण्यात आले असून, त्यांना सहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी २० कामगार अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहेत.
जळगाव, जामनेर, जैन इरिगेशन कंपनीच्या अग्निशन दलातर्फे आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांनी थेट दिली आहे.