जळगाव कडाक्याच्या थंडीने गारठले ; पुढील दोन दिवस राहणार असे?

जळगाव । उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे. जळगावमध्ये मागील दोन दिवसांपासून दिवसा वारे ताशी १२ ते १८ किलोमीटर वेगाने वाहताहेत. यामुळे जळगाव कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. दरम्यान, जळगावात पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढू शकतो. मंगळवारनंतर आकाश किंचित ढगाळलेले असेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.

दरम्यान, राज्यातील जळगावसह अनेक भागात गारठा वाढला असून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज तापमानात काही प्रमाणात चढ उत्तर होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही गारठा कायम राहणार आहे. सध्या जळगाव कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत रात्रीच्या तापमानात आणखी घट होऊन गारठा वाढू शकतो. असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.