जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्ते विकासासाठी 45 कोटींच्या कामांना मान्यता : पालकमंत्री

जळगाव  : सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशात पुरवणी बजेट अंतर्गत  जळगाव ग्रामीण मतदारसंघात रस्ते व पुलांच्या बांधकामासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने  सुमारे 45 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. यात जिल्हा परिषदेचे ग्रामीण मार्ग व  इतर जिल्हा मार्गांसाठी 11 कोटी तर, सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणारे प्रमुख जिल्हा मार्ग रस्ते व त्यावरील पुलांच्या विकासाकरिता 34 कोटींचा निधीचा समावेश आहे. रस्त्यांच्या विकासातून शेतकऱ्यांचे हित साध्य होणार असून दळणवळणाची साधने चांगली उपलब्ध असतील तर रोजगार व उद्योग वाढीला चालना मिळते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात व मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे. रस्ते विकासासाठी पालकमंत्र्यांचा झंझावाताने  रस्ते  विकासास मदत होणार असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

सा.बां.चे रस्ते व पुलांसाठी  सुमारे 34 कोटी निधी मंजूर   

धरणगाव तालुक्यातील, अहिरे गावालगत अंजनी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करणे- 7 कोटी,  अंजनी नदीवर वाघळूद बु. गावाजवळ मोठ्या पुलाचे बांधकाम करणे-  3 कोटी 96 लक्ष, नारणे ते नांदेड रस्ता प्रजीमा-52 ची रुंदीकरणासह  सुधारणा करणे – 3 कोटी, रामा – 41 ते निशाणे रस्ता प्रजिमा- 50 ची सुधारणा करणे – 1 कोटी 90  लक्ष , चावलखेडा – 06  – भोद  फाटा रस्ता प्रजिमा – 50 ची सुधारणा करणे – 3 कोटी, तर जळगाव तालुक्यातील

फुपनगरी ते ममुराबाद गिरणा पंपिग रस्ता रा.मा. 38 चे जलनिस्सारणासह रुंदीकरण व डांबरीकरण करणे – 5 कोटी, विटनेर ते वराड रस्ता प्रजिमा- 08  चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे- 3 कोटी, जवखेडा ते वडली आणि पाथरी ते म्हसावद रस्ता प्रजिमा-08 चे  जलनिस्सारणासह मजबुतीकरण करणे- 3 कोटी,  आसोदा ते देऊळवाडे  रस्ता प्रजिमाचे मजबुतीकरण करणे- 3 कोटी  असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांसाठी 34  कोटी निधीच्या रस्त्यांना मान्यता मिळाली आहे.

जि.प.च्या रस्त्यांसाठी 11 कोटी निधी मंजूर  

धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 16  रस्त्यांच्या व मोऱ्या बांधकामासाठी 11 कोटी  निधी मंजूर करण्यात आला आहे. यात  वाघळूद बु. ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 32 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण करणे- 90 लक्ष, नांदेड ते धुरखेडा  रस्ता ग्रा.मा. 49 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 1 कोटी, चांदसर ते  निंभोरा रस्ता ग्रा.मा. 155 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, एकलग्न ते बोरखेडा रस्ता ग्रा. मा. 16 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, शेरी ते निमखेडा रस्ता ग्रा. मा. 150 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, वराड ते पोखरी  रस्ता ग्रा. मा. 05 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, चांदसर ते कवठळ रस्ता ग्रा. मा. 156 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, शेरी ते पथराड बु रस्ता रस्ता ग्रा. मा. 158 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, घुरखेडा- नारणे – कामतवाडी – पष्टाणे रस्ता इजिमा 120 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 1 कोटी, अंजनविहीरे ते वाकटुकी  रस्ता ग्रा.मा. 162 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 1 कोटी , चावलखेडा- अनोरे रस्ता ग्रा. मा.136 चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष, कल्याणे खु. ते माळपिंप्री रस्ता ग्रा. मा. 141चे जलनिस्सारणासह मजबुतीकरण व डांबरीकरण- 90 लक्ष असे 11 कोटींचा निधीस मान्यता मिळाली आहे. यातील बहुतांश रस्ते हे शेतकऱ्यांसाठी महत्वाचे असून त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.