---Advertisement---

जळगाव : घराच्या बांधकामासाठी पैश्याची मागणी करत पतीची पत्नीला मारहाण

by team

---Advertisement---

जळगाव : शहरातील वाल्मिक नगर परिसरात विवाहितेला घराचे बांधकाम करण्यासाठी माहेरहून पैसे आण अशी मागणी करत पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील वाल्मिक नगरात मुकेश अभिमन शिंदे हा त्याची पत्नी नयना मुकेश शिंदे हीच्यासोबाबत वास्तव्याला आहे. आपल्या घराच्या बांधकामासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी पती मुकेशने केली. दरम्यान विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसेचे पैसे घेवून येशील तर तुला घरात घेईल अशी धमकी देवून शारिरीक व मानसिक छळ केला.

हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी ४ मार्च रोजी मुकेश अभिमन शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---