जळगाव : जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 16 ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या, तर उर्वरित 151 ग्रामपंचायती निकाल हाती आला असून, यात शिंदे गटासह भाजपचा बोलबाला पाहिला मिळाला असून शिंदे गट भाजपपाठोपाठ अजित पवार गटालाही मोठा विजय मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील तसेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी आपला गड राखत वर्चस्व सिद्ध केले असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना बोदवड तालुक्यात अपेक्षित यश आलं असलं तरी मुक्ताईनगर सह जिल्ह्यात मात्र मोठा धक्का बसला आहे.
जळगाव जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाने 63 जागांवर तर भाजपने 54 जागांवर दावा केला असून अजित पवार गटाने 22 जागांवर दावा केला आहे. मात्र ठाकरे गटाला केवळ 3 जागा तर काँग्रेसला 4 जागांवर समाधान मानावे लागले असून प्रहार पक्षाने एका ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवत जिल्ह्यात खाते उघडले आहे. तर उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार सरपंच पदी विजयी झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील 167 ग्रामपंचायतींचा एकूण निकाल
शिंदे गट 63
भाजप 54
अजित पवार 22
शरद पवार 11
काँग्रेस 04
ठाकरे गट 03
प्रहार 1
अपक्ष 8
अर्ज न आल्याने रिक्त ग्रामपंचायत 01