जळगाव जिल्ह्यात चोरट्यांचा सुळसुळाट, भररस्त्यात व्यावसायिकाला लुटले

जळगाव : शहरासह जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ वाढला असून, दररोज लहान मोठ्या घटना समोर येत आहेत. जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्याजवळ व्यवसायिकाचा रस्ता आडवून बॅगेत ठेवलेले १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड अज्ञातांनी जबरीने हिसकावून चोरून नेली. अमळनेर बसस्थानक आवारातून महिलेच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीची सोन्याची बांगडी अज्ञातांनी चोरून नेली. या प्रकरणी संबंधित पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

जामनेर ते शहापूर रोडवरील बेलफाट्याजवळ व्यवसायिक निलेश रतन पवार (३६,रा. शहापूर ता. जामनेर) १ लाख ९३ हजार ५०० रूपयांची रोकड घेवून निलेश पवार हे दुचाकीने घराकडे निघाले होते. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यानाच बेलफाट्या रस्त्यावर अज्ञात तीन जणांनी रस्ता आडविला. त्यांनी निलेश पवार यांना बेदम मारहाण करून त्यांच्या जवळील रोकड ठेवलेली पिशवी लांबविली. हा प्रकार घडल्यानंतर निलेश पाटील यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे हे करीत आहे.

दुसऱ्या घटनेत, भारतीबाई वसंत पाटील (५६, रा. एकलहरे ता. अमळनेर) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कामाच्या निमित्ताने सोमवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता त्या अमळनेर बसस्थानक आवारात आलेल्या होत्या.त्यावेळी अज्ञात चोरट्यांने त्यांच्या हातातील ६२ हजार ५०० रूपये किंमतीच २५ ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने सोन्याच्या बांगडीचा सर्वत्र शोध घेतला. परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.