जळगाव : जिल्ह्यात ५ लाख २० हजार अर्ज भरले. वर्षाला ४० कोटी रुपये मिळणार आहे. महिलांसह सर्व घटकांसाठी आपण योजना राबवल्या. काही लोक आपल्याबद्दल अफवा पसरवत आहे परंतु शासनाने ३५ हजार कोटी मंजूर केले आहे, म्हणून कुणीही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ मंगळवारी जळगावात करण्यात आला. सागर पार्क मैदानावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, अनिल पाटील, खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.लता सोनवणे, आ.चंद्रकांत पाटील, आ.चिमणराव पाटील, आ.किशोर पाटील, संजय सावकारे, आ.मंगेश चव्हाण आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.
येत्या काही महिन्यात विरोधकांचे टांगा पलटी, घोडे फरार होणार आहे. जिल्ह्यात नारपार योजना, केळी महामंडळ, सिंचन योजना, बहिणाबाई स्मारकासह अनेक योजनांसाठी शासनाने निधी दिला. आज इथे बसलेल्या महिला भगिनींची गर्दीच सांगते की ही योजना छप्पर फाड योजना आहे, असेही पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील म्हणाले.