जळगाव जिल्ह्यास अवकाळीचा फटका ; पाच तालुक्यांमंध्ये पिकांचे नुकसान

जळगाव : राज्यात काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दररोज विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होत असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या वादळी वाऱ्याचा फटका जळगाव जिल्ह्यातील पाच तालुक्यांना बसला आहे. यामध्ये केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्यातील काही भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस होऊन जिल्ह्यातील पाच तालुक्यांना अधिक फटका बसला आहे. पाच तालुक्यांतील ५८ गावांमधील १ हजार ७२० शेतकऱ्यांच्या केळी व पपई पिकांचे नुकसान झाले आहे.
जामनेर, बोदवड, यावल या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे केळीच्या बागांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच तालुक्यांना दोन दिवसापूर्वी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा दिला. जिल्ह्यातील सुमारे ५९ गावे बाधित झाली असून १ हजार ७२० हेक्टरवरील केळीच्या बागांचे नुकसान झाले आहे. यात पपईची पिके नष्ट झाली असून एकूण १ हजार ७५० हेक्टरवरील पिकांना याचा फटका बसला आहे