जळगाव : रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी’ आयोध्येत स्थापन झालेल्या प्रभु श्री राम यांचे रूप डोळ्यांमध्ये बसवा. आपली जी बुद्धी आहे त्यात रामांना पाहून सुखी झाले पाहिजे. राग, व्देष, वैर आणि भय या चार गोष्टीचा त्याग केल्याने बुद्धी सुखरूप होते. तसेच हनुमंत भेट, बालीवध, वनलीला व सेतू बंध, विभीषण भेट, इंद्रजीत, कुंभकर्ण, रावणवध आणि प्रभु श्री राम यांचे राज्याभिषेक सोहळा जी. एस. मैदानावर उत्साहात साजरा झाला. आज पंच दिवशीय कथेत प्रभु रामांच्या विविध आदर्शांचे उदाहरण देवून हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी कथेत विषद केली.
प्रभु श्री राम यांचा आदर्श सर्वांनी अंगिकारला पाहिजे आणि बुद्धीत आणला पाहिजे. आपण त्यांचे आदर्श पहिले, रामायण चित्रण पाहिले आहे. रामाच्या नावाने आपण नाचलो आहे. परंतु रामायणातील जे आदर्शगुण आहेत; जसे मातृसेवा, पितृसेवा, सत्यवचन, राष्ट्रधर्म आणि समाजधर्म… ज्यामुळे राम सर्व समाजात लोकप्रिय आहेत. यातून आपण सुध्दा समाजाला प्रिय झालो पाहिजे. पण आपण आपल्याच घरात पत्नी, मुले, आई-वडील यांसह इतर सदस्यांना अप्रिय होतो. तथापि, बदलेल्या काळानुसार नात्यात अनेक बदल झालेले पाहायला मिळतात. पण यासर्वमध्ये प्रभू राम आणि सीता माता यांच्या नात्यातून आपण अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. जेव्हा आदर्श पती-पत्नीचे उदाहरण दिले जाते तेव्हा प्रभू श्री राम आणि माता सीता यांचे नाव नक्कीच घेतले जाते आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. या दोघांची जोडी अनेकांना प्रेरणा देते. आजकालची जोडपी भांडण झाल्यावर एकमेकांबद्दल वाईट बोलू लागतात. पण जेव्हा माता सीता लव आणि कुशसह भगवान श्री रामापासून वेगळे राहू लागली तेव्हा तिने कधीही प्रभू रामाबद्दल कोणताही वाईट विचार आपल्या मनात येऊ दिला नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टीचा परिणाम तुमच्या मुलांवर होणार नाही याची काळजी घ्या. असे निरुपण हभप परमपूज्य दादा महाराज जोशी यांनी आज (दि.२४) पंच दिवशीय कथा समाप्तीवेळी केले आहे.
आज पंच दिवशीय कथाप्रारंभी राम भजनांनी भक्तगण राम नामात तल्लीन झाल्याचे चित्र दिसून येत होते. कथासमारोपाच्या वेळी उद्योजक अशोक जैन यांना दादा महाराज जोशी यांच्या हस्ते श्री राम मंदिराची प्रतिकृती भेट देवून सन्मानित करण्यात आले. धर्म जागृत संस्थेचे अध्यक्ष भाईजी मुंदडा, आरएसएस विभाग जळगाव कार्यवाहक अविनाश नेहेते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जळगाव नगर कार्यवाहक विजय ठाकरे आणि आरएसएस निहाय समन्वयक राजू व्याने यांना देखील दादा महाराजांच्या आशीर्वाद स्वरुपात राम नाम दुपट्टा आणि श्री राम मंदिराची प्रतिकृती भेट देण्यात आली.
आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, आ. सौ. लताताई सोनवणे, माजी आ. चंद्रभाई पटेल, श्रीराम भाऊ खटोड, नंदूशेठ अडवाणी, कथाकार साईगोपाली देशमुख, माजी नगरसेवक राजेंद्र घुगे पाटील, माजी नगरसेवक विजय व रंजना वानखेडे, माजी नगरसेवक चंद्रकांत आबा कापसे, समीर शिंदे, माजी नगरसेवक भगतभाई बालाणी, गणेश शिंदे, माजी नगरसेवक सदाशिव ढेकळे, माजी महापौर भारतीताई कैलास आप्पा सोनवणे, कल्पेश सोनवणे,
माजी नगरसेवक जितेंद्र मराठे, धोबी समाज अध्यक्ष दीपक बाविस्कर, उद्योजक महेश अग्रवाल, डॉ. राधेश्याम चौधरी, गौरव पाटील, रवींद्रसिंग पाटील, विशाल कोल्हे, अविनाश बोरोले, राजेंद्र कोल्हे, पांडुरंग इंगळे आणि प्रशांत इंगळे यांच्यासह आधींना महाआरती करण्याचे सौभाग्य लाभले. यानंतर भाविकांना प्रसाद वितरण करण्यात आला.