जळगाव-थाळनेर मुक्कामी बस सुरू करण्याची प्रवाशांनी केली मागणी

थाळनेर : जळगाव ते थाळनेर  मुक्कामी बस सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. थाळनेर येथून चोपडा, धरणगाव, एरंडोल, जळगाव, रावेर, भुसावळ, मध्य प्रदेशातील ब-हाणपूर याठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.  थाळनेरच्या प्रवाशाचे मोठ्या प्रमाणत हाल होत आहे, तसेच बस प्रवासामध्ये त्याचा मोठया प्रमाणात खर्च देखाली होतो थाळनेर येथील प्रवाशांना जाण्यासाठी बस नसल्याने, प्रवाशांना थाळनेर येथून सकाळी लवकर शिरपूर जावे लागत असते.

तेथून जळगाव अथवा इतरत्र जावे लागते. यात वेळेचा आणि पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असतो. जळगाव आगाराने थाळनेर मुक्कामी बस सुरू केल्यास थाळनेरसह परिसरातील प्रवाशांना जळगाव जिल्ह्यासह मध्य प्रदेशात जाणे सोयीचे होऊ शकणार आहे. तसेच एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. त्यामुळे जळगाव आगाराने जळगाव-मांजरोद ही मुक्कामी बस थाळनेर येथे मुक्कामी करावी. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी जळगाव एसटी महामंडळास पत्रव्यवहार करून जळगाव-थाळनेर ही मुक्कामी बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.