जळगाव न्यायालयातील थरारनाट्यातील फरार साथीदाराचे मंगला एक्सप्रेसमधून आवळल्या मुसक्या

जळगाव : मुलाचा खून करणार्‍या आरोपींना मारण्यासाठी बाप साथीदारासह थेट जळगाव न्यायालयाच्या आवरात आला होता. जळगाव शहर पोलिसांनी त्याचा खून करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. मनोहर दामू सुरळकर (वय ४५ वर्षे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. मात्र त्या ठिकाणाहून सुरेश पसार झाला होता. त्याने जळगाव स्थानकातून मंगला एक्सप्रेस पकडली आणि कल्याण गाठले. परंतु त्याला देखील कल्याणच्या आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांनी पिस्तूलसह मंगला एक्सप्रेसमधून अटक केली. त्याच्याजवळून पोलिसांनी एक पिस्टल व चार काडतूस हस्तगत केले आहेत.

दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर जेलमध्ये गेला होता. जेलमधून तो जामिनावर सुटून आला. ज्या तरुणाची धम्मप्रियची हत्या केली होती. त्याच्या साथीदाराने गोळ्य़ा घालून धम्मप्रिय सुरडकर याची हत्या केली. आरोपींना जळगाव कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच धम्मप्रियचे वडिल मनोहर सुरडकर यांनी साथीदारासह आरोपींना मारून बदला घेण्यासाठी कट रचला. मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी जळगाव कोर्टात गेले. त्याच्यासोबत सुरेश हिंदाटे हा तरुण सुद्धा होता. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मनोहर याला ताब्यात घेण्यात आला. सुरेश हिंदाटे हा पसार झाला होता. अखेर हिंदाटे याला मंगला एक्सप्रेस मधून कल्याण जीआरपी व आरपीएफ ताब्यात घेतले.

रेल्‍वेत तपासणी करताना अडकला
कल्याण आरपीएफ स्कॉड आज पहाटे कल्याण स्टेशनला ट्रेनमधून येणाऱ्या प्रवाशांची बँगची तपासणी करीत होते. त्याच वेळी मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. या गाडीच्या एका बोगीत तपासणी करीत असताना एका तरुणाच्या बॅगेत पिस्तूल आणि चार जिवंत कारतूस सापडली. स्कॉडचे प्रमुख अनिल उपाध्याय आणि अन्य आरपीएफ जवानांनी या तरुणाला पुढील प्रक्रियेसाठी कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात दिले.