जळगाव बनावट सोने : अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणातून सोने तारण ठेवणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव : बनावट सोने खरे असल्याचे भासवित चक्क फायनान्स कंपनीलाच गंडविण्याचा प्रकार शहरात उघडकीस आल्याने सारेच चक्रावले आहेत. परंतु, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणातूनच बनावट सोने तारण ठेवणाऱ्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

बनावट सोने तारण ठेवणाऱ्या टोळीतील मनप्पुरम फायनान्स लिमीटेड कंपनी या संस्थेचे शहरातील नवीपेठेत कुकरेजा कॉम्प्लेक्स येथे कार्यालय आहे. सोने तारण ठेवून ही संस्था ग्राहकांना त्वरीत कर्ज उपलब्ध करुन देते. याचा फायदा उचलत बनावट सोने तारण ठेवून कर्जाने पैसे काढत असल्याचा कांगावा करीत या टोळीने फसवणूक करण्याचा धंदा मांडला होता. शहर पोलिसांनी या टोळीतील चार साथीदारांच्या ६ रोजी सकाळी ११ वाजता मुसक्या आवळल्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आग्रा येथील सतिषचंद्र शोवरन सिंग (वय ३२), संतोष मुन्नालाल कुशवाह (वय ३५) या दोघांना शहरातील एका लॉजमधून अटक केली. या गुन्हयात एकूण चार जणांना अटक झाली आहे. त्यांचे अन्य साथीदार असण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. नकली

दागिने देत फसगत 

हर्षल रविंद्र पेटकर (वय २३.रा. नवीपेठ) हे मनप्पुरम फायनान्स लिमीटेड या खाजगी संस्थेत शाखा व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहतात. या कार्यालयात शनिवार, १ रोजी सायंकाळी ४.३५ वाजता जोराराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा हे आले. सोने तारण ठेवून कर्ज हवे, अशी बतावणी त्यांनी केली. त्यांच्याकडे असलेले नकली सोने त्यांनी बँक अधिकाऱ्यांसमोर काढून दिले. या दागिन्यांच्या मोबदल्यात या कर्ज घेतले. बनावट दागिने तारण ठेवून लाखो रुपये मिळविण्याच्या इर्षेने दोन संशयित बुधवार, ५ रोजी पुन्हा या फायनान्सच्या कार्यालयात बनावट दागिने घेऊन कर्ज घेण्यासाठी हजर झाले. हे दागिने पाहिल्यानंतर व्यवस्थापक पेटकर यांना शंका आली. अशाच पध्दतीने दागिने तारण ठेवून कर्ज दिल्याचे त्यांना आठवले. त्यांनी ते दागिने तपासले असता नकली असत्याचे प्रकरण उघड झाले. या प्रकाराने व्यवस्थापकासह कर्मचारी व्यवस्थापकाने या दोघांना विश्वासात घेत दागिने तारणवर ४० हजार जादा देत असल्याचे अमिष दाखवित इतर साथीदारांना बोलविण्याचे सांगितले. बुधवार, ६ रोजी सकाळी ११ वाजता जोराराम रानुराम बिस्नोई, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा हे वाढीव रक्कम घेण्यासाठी आले. त्याबरोबर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. बनावट सोने टोळीतील सतिषचंद्र शोवरन सिंग (वय ३२), संतोष मुन्नालाल कुशवाह (वय ३५, संशयितांनी २ लाख ६६ हजार रुपये चक्रावले. दोन्ही रा. आग्रा उत्तरप्रदेश) या दोघांना शहरातील एका लॉजमधून पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी जोराराम रानुराम बिस्नोई (वय ५०, रा. दोडासर ता. फलौदी राजस्थान हमु नशिराबाद), दागिने कारागीर खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा (वय ३१, रा. आग्रा उत्तरप्रदेश ह.मु. बालाजीपेठ जळगाव), तसेच संतोष कुशवाह सतिषचंद्र सिग यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र सोनार करीत आहेत.