जळगाव : एरंडोल तालुक्यातील कढोली येथील बेबाबाई योगेश बाविस्कर (२३) या मुलगा भाग्येश योगेश बाविस्कर (३ ) याला सोबत घेत मंगळवार, २८ रोजी सकाळी १० वाजता बेपत्ता झाल्या. याप्रकरणी बुधवार, २९ रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली.
एरंडोल तालुक्यातील कढोली गावात बेबाबाई योगेश बाविस्कर या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार, २८ रोजी सकाळी १० वाजता त्या आई रत्ना शत्रुघन कोळी आणि मुलगा भाग्येश बाविस्कर यांच्यासोबत जळगाव येथील बसस्थानक येथे आलेले होते.
बेबाबाई बाविस्कर या मुलगा भाग्येस याला सोबत घेत पाण्याची बाटली घ्यायला गेल्या. मात्र, बराच वेळ झाल्याने आई रत्ना कोळी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
अखेर बुधवार, २९ मे रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.