जळगाव : रावेर लोकसभेसाठी भाजपने पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या विरोधात हि जागा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार गटाचे एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांना रक्षा खडसे यांच्या विरोधात प्रचार करावा लागणार आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समिकरणांकडे सर्वांचं लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांनी माध्यमांशी बोलत असतांना लोकसभा निवडणूक आणि राजकीय समिकरणं यावर स्पष्ट भाष्य केलं. आपण ही लोकसभा निवडणूक जिंकू असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाल्या रक्षा खडसे ?
माझे कुटुंबीय नसलं तरी सर्व भारतीय जनता पार्टीचा परिवार, पूर्ण संघटन माझ्या पाठीशी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन हे सर्व पाठीशी उभे आहेत. सर्वांनी माझी विजयाची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही. महायुती ही निवडणूक जिंकणारच आहे, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला आहे.