जळगाव मतदार संघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.15 तर रावेर मतदार संघात 45.26 टक्के मतदान

जळगाव :  जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंतची रावेर मतदार संघात 45.26 टक्के मतदान झाले आहे.  जळगाव लोकसभा मतदारसंघात 42.15  टक्के मतदान झाले.

जळगाव लोकसभा मतदार संघात विधानसभानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ –39.23 %, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ –45.02 %, अमळनेर विधानसभा मतदारसंघ –41.16 %, एरंडोल विधानसभा मतदारसंघ –46.04 %, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ –39.07 %, पाचोरा विधानसभा मतदारसंघ – 43.80 टक्के मतदान झाले.

रावेर लोकसभा मतदारसंघात 45.26 टक्के मतदान 

रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभानिहाय टक्केवारी पुढील प्रमाणे. चोपडा विधानसभा मतदारसंघ 46.16 %, रावेर विधानसभा मतदारसंघ –48.71 %, भुसावळ विधानसभा मतदारसंघ –43.16 %, जामनेर विधानसभा मतदारसंघ –41.70 %,  मुक्ताईनगर मतदारसंघ –43.10 %,  मलकापुर विधानसभा मतदारसंघ – 48.67टक्के मतदान झाले आहे.