जळगाव : महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते हे आमदार सुरेश भोळे यांच्यावर विविध आरोप करत आहेत. हे आरोप करण्यापूर्वी त्यांनी काय केले हे सांगावे. भाजपचे नगरसेवक फोडून त्यांनी महापौर पद मिळविले आहे, असे असतानाही शहराच्या विकासाच्या कामात भाजपच्या नगरसेवकासह आमदार सुरेश भोळे आणि ना. गिरीश महाजन यांनी साथ दिली आहे. आमदार सुरेश भोळे व ना. गिरीश महाजन यांच्यात योग्य समन्वय आहे. या दोघांचे प्रयत्न आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत 300 कोटी रूपये आणले आहेत. मात्र विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांच्या तत्कालीन मुख्यमत्र्यांकडून किती निधी आणला व त्यातून कोणती विकास कामे केलीत हे सांगावे? असे पत्रक महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र घुगे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. गिरीश महाजन यांनी राज्य शासन व हुडकोचे अधिकारी यांच्यात बैठक घेत मनापाकडे असलेली कर्जाची रक्कम 450 कोटीची रक्कम 250 कोटींवर सेटलमेंट केली, तर मनपाला 250 कोटीची रक्कम देत कर्जमुक्त केले. दिलेल्या 250 कोटीपैकी मनपाने फक्त 125 कोटी बिनव्याजी राज्य सरकारला परत केले आहे. हे त्यावेळेस केले नसते तर आज 450 कोटी रूपयांच्या कर्जापोटी दर महिन्याला 3 कोटी व्याज भरत्ा राहीलो असतो. यासाठी ना. गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे यांनी केलेले प्रयत्न उल्लेखनिय आहे.
मनपा फंडातून कोणती काम केलीत
माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन यांनी मनपा फंडातून शहराच्या विकासासाठी किती कामे केलीत. अमृत योजना, घंटागाडीचा निधी भुयारी गटारींचा निधी केंद्र सरकारचा, मेहरूण तलाव सुशोभिकरणासाठीची निधी राज्य सरकारचा, मनपा इमारतीला लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल हे नाव देण्याचा ठराव 2001 मध्ये भाजपानेच केला होता. तर पुत्ाळ्यासाठीचा खर्च आमदार सुरेश भोळे यांनी करून तो मनपाला दिला आहे. हा ठरावही तत्कालीन महापौर सीमा भोळे यांच्या काळात केलेला होता.
विकासासाठी नेहमी सोबत होतो
शहराच्या विकासासाठी भाजप महापौरांसोबत होते. त्यावेळेस त्यांची शिवसेनाही त्यांच्यासोबत नव्हती. सभागृहात तुमच्याकडे बहुमत नसतानाही भाजपाचे बहुमत असतांना विकासाच्या कामांना तुमच्यासोबत राहत मंजुरी दिली आहे. जनतेने तूम्हाला बहुमत दिलेले नसतानाही तुम्ही भाजपाचे नगरसेवक फोडून महापौर झालेले आहात हे विसरु नका.
डबल ढोलकी वादक
माजी विरोधी पक्ष नेते सुनील महाजन म्हणजे डबल ढोलकी वादक आहेत. राज्य शासनाकडून निधी आला की त्यांचे श्रेय आणि केंद्राचा निधी मात्र येतच असतो, असे म्हणायचे. माजी महापौरांनी आमदारांवर आरोप करण्यापेक्षा स्वत:ची निष्ठा सिध्द करावी. कधी त्या शरद पवारांसोबत असतात तर कधी नाथाभाऊंसोबत तर कधी उद्धव ठाकरेंसोबत असतात. विरोधी पक्ष नेत्यांनी सभेत विरोध तरी केला का? केंद्राचा निधी शहरात पोहचला पण राज्य शासनाचा निधी शहरात पोहचला का? याचे उत्तर त्यांनी द्यावे असेही पत्रकात नमुद केले आहे.